आमसूलचे आरोग्यदायी फायदे

विविध पदार्थ बनवताना पदार्थाची चव वाढावी यासाठी आमसूल घातले जातात. टोमॅटोसाठी पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. चवीला आंबट असणारा हा पदार्थ कोकण, केरळ, गोवा या भागांमध्ये आढळतो. कोकमचे फळ सुकून त्याच्या सालीपासून आमसूल बनवले जाते.

आमसूल जेवणामध्ये वापरण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. याच आमसुलाचे आपल्या आरोग्यासाठी बरेच फायदे पाहायला मिळतात. आज आपण आमसूलचा आपल्या आहारात वापर केल्याने आपल्या आरोग्याला कोण कोणते  फायदे होतात  हे पाहणार आहोत.

आमसूल वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. आमसूलमधील एंटीऑक्सीडेंट गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आमसुलाचे सेवन केल्यास वजन लवकर घटते.

आमसूलाचा आपल्या आहारात वापर केल्याने अपचनाचा त्रास दूर होण्यास मदत मिळते. आमसूलाचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही नियमित आमसुलाचे सेवन केल्यास मधुमेहासारख्या आजारांवर मात करू शकाल. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी आमसूल फार उपयुक्त आहे.

आमसूल हे पित्तनाशक आहे. उन्हामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. अवेळी जेवणे, झोपणे यामुळे पित्त होते. अशा वेळेस आमसुलाचे सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

आमसूलामध्ये पोटॅशियम असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये हे लाभकारक आहे. नियमित आमसुलाचे सेवन केल्यास हार्ट अटॅक सारख्या समस्येपासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांवर आमसूल हा एक चांगला उपाय आहे.

आमसूलामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ए आणि विटामिन ई असल्यामुळे डोळ्यांच्या आजारांवर फायदेशीर आहे. डोळ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या आमसुलाचे सेवन केल्यास डोळ्यांच्या आरोग्याला फायदा होतो.

आपल्याला आमसूलचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.  आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *