आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करतात. हिरव्या रंगाचे तुरट व आंबट चवीचे, अत्यंत गुणकारी औषधी फळ म्हणजे आवळा. आयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग विविध आजारामंध्ये केला जातो. आज जाणून घेऊयात आवळ्याचा मुरांबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आवळ्याचा मुरांबा नियमित सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणार नाही. आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने एसिडीटीचा पासून मुक्तता मिळते. भूक वाढते आणि पचनशक्ती देखील चांगली होते.
एक मोठा चमचा आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने सर्दी, खोकला अशा आजारांमध्ये त्वरित आराम मिळतो. आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने केस मजबूत बनतात. आणि केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते.
नियमित पणे १ चमचा आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो. आवळ्याचा मुरांबा नियमीत पणे खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येत नाही.
सतत तोंड येत असेल तर आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल. नियमितपणे मुरांबा खाल्ल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने नजर तीक्ष्ण होते.
नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. नियमितपणे मुरांबा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
आपल्याला आवळ्याचा मुरांबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: इंडियन एक्सप्रेस