पुणे शहराचा बाहेर अनेक पुरातन मंदिरे पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यापासून नसरापूर येथे असलेले महादेवाचे सुंदर मंदिर म्हणजे बनेश्वर मंदिर. पुण्यापासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरामध्ये हे सुंदर मंदिर वसलेले आहे.
भोर तालुक्यात स्थित असलेल्या या मंदिराचे नाव पडण्यामागे एक गोष्ट सांगितली जाते, येथील शिव मंदिराभोवती केतकीचे बन, जांभुळ, करंज यांसारख्या वृक्षांची दाट वस्ती आहे. त्यामुळे या ठिकाणाला ‘बनेश्वर’ असे नाव पडले आहे, असे येथील स्थानिक लोक सांगतात.
जंगलामध्ये वसलेले हे मंदिर म्हणजे वास्तुरचनेचा उत्तम नमुना होय. या मंदिराची स्थापना बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये केली.
मंदिराच्या आवारामध्ये पोर्तुगिजांचा यु’द्धात पराभूत केल्याचे विजय चिन्ह म्हणून एक भव्य घंटा आहे. चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगिजांना पराभूत केले होते. या घंटेवर १६८० असे कोरले असून वर एक क्रॉस चिन्ह आहे.
मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुंदर तळे दिसते. तेथून पुढे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर महादेवाची सुंदर शिवपिंड नजरेस पडते. महादेवाचे दर्शन घेऊन बाहेरील आवारामध्ये आल्यानंतर झाडाझुडपांमध्ये येणारा पक्षांचा किलबिलाट मनास गारवा देऊन जातो. निसर्गप्रेमी आणि यात्रेकरूंसाठी हे ठिकाण म्हणजे पर्यटनाचे उत्कृष्ट ठिकाण आहे.
या मंदिराभोवती वन संरक्षित क्षेत्र आहे. येथे अनेक मनोरंजनपर खेळ खेळण्याची सुविधा करण्यात आली आहे. वनभोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता. पण बनेशवराचे हे देवस्थान म्हणजे शिवशंभू भक्तांसाठी असलेले एक अल्हाददायक ठिकाणच आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.