भारतामध्ये हिमालयीन आणि द्वीपकल्प नद्यांचे विशाल जाळे पसरलेले आहे, म्हणून भारताला ‘नद्यांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे.
भारतात नद्यांची पूजा केली जाते, त्याचे कारण असे की नदी ही सर्व प्राण्यांची जीवनरेखा आहे. भारताची नव्वद टक्के नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात आणि उर्वरित अरबी समुद्राकडे वाहतात.
गंगा नदी : २५२५ किमी लांब – गंगा नदी ही हिंदूसाठी सर्वात पवित्र नदी आहे आणि ती गंगा देवी म्हणून ओळखली जाते. दुर्दैवाने, ही जगातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. उत्तराखंडमधील गंगोत्री ग्लेशियरकमधून उगम पावते आणि बंगालच्या उपसागरामध्ये मिसळते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातून ही नदी वाहते. गंगा नदीचा शेवट बांग्लादेशात होतो.
गोदावरी नदी : १४६४ किमी – गंगा नदीनंतर गोदावरी नदी ही भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. ही नदी अनेक हजारो वर्षांपासून हिंदू धर्मग्रंथांमध्ये पूजनीय आहे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जोपासत आहे.
गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि या नदीला “दक्षिण गंगा” म्हणून ओळखले जाते. ही नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, नाशिक येथून उगम पावते आणि छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून वाहते. शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
यमुना नदी : १३७६ किमी – यमुना नदी ही गंगा नदीची प्रदीर्घ उपनदी आहे. यमुना नदी ही उत्तराखंडच्या उत्तर काशीतील बंदर पूछच्या शिखरावर यमुनोत्री हिमनदीपासून उगम पावली आहे. ही नदी उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून वाहते.
नर्मदा नदी : १३१२ किमी – नर्मदा नदी ही रेवा म्हणून ही ओळखली जाते, प्रायद्वीपीय भारतातील सर्वात मोठी आणि पश्चिम दिशेला वाहणारी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक डोंगरावर झाला आहे.
ही भारताच्या सात पवित्र नद्यांपैकी एक आहे आणि हिंदूंच्या विविध प्राचीन ग्रंथात या नदीचा उल्लेख आहे. ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते.
कृष्णा नदी : १३०० किमी – कृष्णा नदी ही कृष्णवन म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पश्चिम घाटातून ही नदी उगम पावते. ही नदी भारतातील सर्वात महत्वाच्या द्वीपकल्पातील नद्यांपैकी एक आहे, जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमधून वाहते आणि शेवटी आंध्र प्रदेशातील बंगालच्या उपसागरात विलीन होते.
सिंधू नदी : १११४ किमी – सिंधू नदी ही प्राचीन सिंधू संस्कृतीचे जन्मस्थान आहे आणि या नदीला एक ऐतिहासिक महत्व आहे. आपल्या देशाचे ‘हिंदुस्थान’ हे नावही या महान नदीच्या नावावरून पडले आहे. सिंधू नदी मानसरोवर तलावापासून उगम पावते आणि लडाख, गिलगिट आणि बलुचिस्तानपर्यंत वाहते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करारामुळे सिंधू नदीने वाहून नेलेल्या एकूण पाण्याचा २० टक्के वापर करण्याची भारताला परवानगी आहे.
सिंधू नदीच्या काही प्रमुख उपनद्यांमध्ये काबूल, झेलम, चिनाब, रवी, बियास आणि सतलज नदीचा समावेश आहे. सिंधू नदीची एकूण लांबी ३१८० किलोमीटर आहे. तथापि, भारतातील त्याचे अंतर केवळ १११४ किलोमीटर आहे.
ब्रम्हपुत्रा नदी : ९१६ किमी – भारताच्या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे ब्रम्हपुत्र. तिबेटमधील हिमायलातील अंगसी हिमनदीपासून ही उगम पावली आहे. येथे याला यार्लंग त्संगपो नदी म्हणून ओळखले जाते.
ही नदी अरुणाचल प्रदेश मार्गे भारतात प्रवेश करते. त्यानंतर ती आसाममधून जाते आणि शेवटी बांग्लादेशात प्रवेश करते. या नदीला आसामची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते.
महानदी : ८९० किमी – महानदी हे दोन संस्कृत शब्द महा (महान) आणि नदी (नदी) यांचा एक संयुग आहे, ज्याचा अर्थ महान नदी आहे. छत्तीसगडच्या सिहावा पर्वतात नदी उगम पावते आणि ओडिशा राज्यातून वाहते.
महानदी हि भारतीय उपखंडातील इतर कोणत्याही नदीपेक्षा जास्त गाळ या नदीत साचला आहे. जगातील सर्वात मोठे मातीचे धरण ओडिशाच्या संबलपूर शहरालगत महानदी नदीवर हिराकूड धरण बांधले गेले आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.