१ ग्लास डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

डाळिंबाच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स, फायबर, विटामिन्स असे शरीराला आवश्यक घटक असतात. शरीराच्या अनेक समस्या तसेच अनेक आजारामध्ये डाळिंब ज्यूस पिल्याने फायदा होतो. चला तर जाणुन घेउयात त्याबद्दल

डाळिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात जे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. डाळिंब ज्यूस पिल्याने  शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

उच्च रक्तदाब समस्या असल्यास आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस डाळिंब ज्यूस प्या असे केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत.

डाळिंब ज्यूस हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. डाळिंब ज्यूस पिल्याने हिरड्या मजबूत होतात आणि दातांची दुर्घंधी घालवण्यासही मदत होते. सांधे दुखीचा त्रास असल्यास रोज एक ग्लास डाळिंब ज्यूस पिल्याने फायदा होतो.

डाळिंब ज्यूस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तापामुळे तोंडाला चव राहत नाही त्यावेळी  डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे असे केल्याने तोंडाला चव येण्यास मदत मिळेल.

डाळिंबाच्या रसाचे सेवन हृदयासाठी सर्वात उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. डाळिंब ज्यूस आतड्यात जळजळ कमी करतो आणि पचन सुधारतो.

लहान मुलाना जुलाबाचा त्रास होत असल्यास डाळिंबाच्या रस पिल्याने जुलाब थांबतात. उलटी, मळमळ होत असल्यास डाळिंब ज्यूस पिल्याने उलटी, मळमळ होत नाही. डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने चांगली भूक लागते.

आपल्याला डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: मेडिकल न्यूज टुडेa

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *