केसांमध्ये कोंडा झाल्यास,केसांमध्ये उवा झाल्यास, डोक्याच्या त्वचेला घाम आल्यास, डोक्याची त्वचा कोरडी पडल्यास, केमिकल युक्त शाम्पूच्या अती वापरामुळे आपले केस कोरडे पडून सुद्धा आपले डोके खाजवू शकते. या काही घरगुती उपायांनी आपल्याला डोक्याला येणारी खाज थांबवू शकता.
डोक्याला खाज येण्याच्या समस्येवर आपण लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता. यासाठी दोन-तीन चमचे लिंबाचा रस कापसावर घ्या. त्यानंतर हा लिंबाचा रस टाळूवर लावा आणि दहा मिनिटे राहूद्या.
नंतर कोमट पाण्याने डोके धुऊन टाका. लिंबाच्या रसात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्या डोक्याची खाज बंद होण्यासाठी मदत मिळेल.
कधी कधी डोक्याची त्वचा कोरडी पडल्यामुळे डोक्याला खाज येत असते. यासाठी थोडेसे खोबऱ्याचे तेल किंचित गरम करून घ्या. त्या तेलाने आपल्या डोक्याला मालिश करा. खोबऱ्याचे तेल एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. त्याचा प्रभाव थंड असतो ज्यामुळे खाज सुटण्याची समस्येपासून आपली मुक्तता होईल.
कोरफडीच्या गराचा वापर केस सुंदर, मजबूत तसेच डॅंड्रफ फ्री करण्यासाठी केला जातो. डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी आपल्या केसांच्या मुळापाशी कोरफडाचा गर लावून हलक्या हाताने चोळा. असे केल्याने आपल्या डोक्यातील कोंडा नाहीसा होऊन खाज येणे बंद होईल.
डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी अपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करता येऊ शकतो यासाठी 1 चमचा अपल सायडर व्हिनेगर कपभर पाण्यात मिसळून कापसाच्या मदतीने आपल्या डोक्याच्या त्वचेवर लावा. 15 मिनिट राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने आपल्या डोक्याला येणारी खाज बंद होईल.
डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करू शकता यासाठी एका कपमध्ये २ चमचे लिंबाचा रस घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळून आपल्या टाळूवर लावा.
लिंबाच्या रसामध्ये अँटी-बॅक्टेरियल, एंटी-फंगल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्याला टाळूवरील मृत पेशी साफ होण्यास मदत मिळते. परिणामी आपल्या डोक्याला येणारी खाज बंद होऊ शकेल.
डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण टाळूवर लावा. 15 मिनिट राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने आपल्या डोक्याला येणारी खाज बंद होण्यास मदत मिळेल.
केसांची तसेच केसांखाली असलेल्या त्वचेची स्वच्छता न राखणे या कारणांमुळे केसांना तसेच केसांखाली असलेल्या त्वचेला खाज येते. म्हणून आपले केस वेळच्या वेळी धुण्याची सवय राहूद्या.
आपल्याला डोक्याला येणारी खाज थांबवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: फार्मइजी आणि हेअल्थलाईन