दुधी भोपळ्यामध्ये कॅल्शिअम,लोह, फॉस्फरस विटामिन बी प्रथिने हे सर्व पोषक घटक असतात. आज आपण जाणून घेणार आहोत. दुधी भोपळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
दुधी भोपळ्याचा समावेश आपल्या आहारात केल्याने स्त्रीयांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते म्हणून स्त्रीयांनी आपल्या आहारात दुधी भोपळ्याचा समावेश अवश्य करावा.
उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असल्यास अशा वेळी दुधी भोपळ्याचा कीस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवा व शांतपणे पडून राहा. असे केल्याने डोळ्यांची होणारी आग कमी होण्यास मदत मिळते.
दुधी भोपळ्याचा समावेश आपल्या आहारात केल्याने दुधी भोपळ्यामध्ये असणारे घटक शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाशी संबंधित बर्या च रोगांचा धोका असतो.
उष्णतेमुळे शरीराची आग होत असल्यास दुधी भोपळ्याच्या रसामध्ये थोडीशी खडीसाखर घालून प्या. असे केल्याने उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. आपल्याला वजन घटवायचे असल्यास दुधी भोपळ्याचा रस प्या. दुधी भोपळ्यातील फायबर भूक कंट्रोल करण्यात मदत करतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर असते. अति काळजीने मेंदूवरील ताणतणाव वाढला असेल व त्यातून डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर अशा वेळी १ कप दुधी भोपळ्याच्या रसामध्ये 1 चमचा मध घालून तो रस सेवन केल्याने डोकेदुखी थांबते.
आपल्याला दुधी भोपळा खाण्याचे आरोग्यादायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.