गाजर खाण्याचे १० जबरदस्त फायदे

गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गाजरात असणारे बिटा कॅरोटिन कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. चला तर जाणून घेऊयात गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

साधारणपणे आपल्याकडे बाजारात गाजर सहज उपलब्ध होते. गाजराची पाने आपण खात नाही. पण गाजरापेक्षा त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात लोह असते. त्यामुळे अनिमिया दूर होतो.

गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाजर चावून खाल्यामुळे तोंडामध्ये लाळ अधिक प्रमाणात सुटते व त्यामुळे घेतलेले जेवण व्यवस्थित पचते म्हणून जेवण करण्यापूर्वी सॅलेडमध्ये गाजर अवश्य खा.  

गाजराचा ज्यूस आपल्या शरीरातून व्हिटॅमिन ए आणि ई ची कमतरता दूर करते. जर याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा, केस तुटणे, नखे खराब होणे  अशा समस्या होतात.

व्हिटॅमिन ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी देखील फायदेशीर आहे. हे डोळ्यांची कमकुवतात दूर करते यासोबतच त्वचा आणि केसांना निरोगी आणि चमकदार ठेवते.

गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने त्वचा चमकायला लागते.गाजरात ए व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठता  आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो. गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने त्वचा चमकायला लागते.

गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, बी इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांच्या आहारात गाजर असायलाच हवे. तसेच ज्यांना नाही त्यांनीही नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.

आपल्याला गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: एन डी टी व्ही.

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *