गवती चहाचे आरोग्यदायी फायदे

गवती चहा हे सहज उपलब्ध होणारे घरगुती औषध आहे. गवती चहापासून बनविलेला चहा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहा नुसता पाण्यामध्ये उकळून पिला तरीही आपल्या शरीरासाठी तो फायदेशीर ठरतो.

डोकेदुखी, सर्दी ,घशातील खवखव यावर रामबाण उपाय म्हणून गवती चहाकडे पाहिले जाते. गवती चहाच्या पानांना एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो. आज आपण जाणून घेऊया गवती चहाचे आरोग्यदायी फायदे.

गवती चहा प्यायल्याने अंगातील आळस निघून जाऊन तुम्हाला फ्रेश वाटेल. मानसिक तणावापासून दूर होण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी बरेच लोक गवती चहा पिणे पसंत करतात.

वारंवार होणारी डोकेदुखी, कंबरदुखी यावर गवतीचहा रामबाण उपाय आहे. अंगदुखीसाठी ही गवती चहा अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहा घेतल्याने तुमची अंगदुखी काही क्षणातच नाहिशी होईल.

तापामध्ये गवतीचहा अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहा पिल्याने घाम येतो. तापामध्ये आपला अंगातील घाम बाहेर पडणे महत्त्वाचे असते. त्यामुळे तापामध्ये गवती चहा घेतल्यास आपल्या अंगातील घाम निघून जाऊन ताप कमी होतो.

उलट्या-जुलाब होत असेल तर गवती चहा घ्या. गवती चहा पिल्याने मळमळ करणे, उलटी होणे, जुलाब होणे थांबेल आणि तुम्हाला आराम वाटेल.

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी नक्की गवती चहाचे प्राशन करावे. गरम पाण्यामध्ये गवती चहा टाकून तो उकळून घ्या आणि ते पाणी कोमट करून प्या. त्यामुळे तुमचे वजन कमी होईल.

आपल्याला गवती चहाचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *