चहा हे सर्वांचे आवडते पेय आहे. भारतामध्ये सर्वात जास्त चहा पिणाऱ्यांचे प्रमाण आहे. परंतु साखरेचा चहा हा शरीरासाठी तितकाच हानिकारक आहे. त्यामुळे साखरेचा चहा न पिता गुळाचा चहा प्या. साखरेपेक्षा गुळामध्ये जास्त पोषक घटक असतात.
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटामिन-बी हे पोषक तत्व असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असल्यास तुम्ही गुळ घालून त्याचा चहा पिऊ शकता.
गुळाचा चहा प्यायल्याने पाचन तंत्रामध्ये सुधारणा होते आणि छातीत जळजळ होत नाही. रोजच्या धावपळीमुळे आपल्याला जास्त थकवा जाणवतो. अशा वेळेस नियमित गुळाचा चहा पिल्यास तुमच्या शरीरामधील थकवा निघून जातो आणि तुम्हाला फ्रेश वाटते.
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुळाचा चहा प्या. गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच सर्दी आणि खोकला यासाठी गुळाचा चहा अत्यंत उपयुक्त आहे.
रोज सकाळी आणि संध्याकाळी गुळाचा चहा प्यायल्याने तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही. डोके दुखत असेल तर आपण गाईच्या दुधात गुळाचा चहा प्यावा. यामुळे आराम मिळतो.
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स उठल्या असतील तर तुम्ही नियमित गुळाचा चहा घेऊ शकता. यामुळे तुमच्या चेहर्याशवरील पिंपल्सची समस्या दूर होईल आणि तुमचा रंग ही उजळेल.
सहसा गुळाचा चहा बनवताना सेंद्रिय म्हणजेच काळा गूळ वापरा. कारण पांढऱ्या गुळामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते. महत्वाची सूचना गूळ गरम असल्याने त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करा.
आपल्याला गुळाचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.