आज जाणुन घेऊयात लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे. व्हिटॅमिन सी शरीरासाठी खूप महत्वाचा घटक असते. लिंबू पाणी व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत असल्याचे सिद्ध झाले आहे व्हिटॅमिन सी हृदयाच्या समस्यांपासून मुक्त होतो आणि स्ट्रोकला प्रतिबंधित करते.
लिंबू, कोमट पाणी आणि मध मिसळून प्यायल्याने पाचन शक्ती वाढते. लिंबू हे यकृतासाठी खूप चांगले मानले जाते, लिंबू पाणी शरीरात पित्त रस तयार करण्यास मदत करते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते.
लिंबू पाणी प्यायल्याने तोंडात लाळ तयार होते आणि तोंड कोरडे होण्यापासून प्रतिबंधित होते. लिंबाचे पाणी पिण्यामुळे माणसाला ताजेतवाने वाटते. आणि श्वास घेण्यास नवीन ऊर्जा मिळते. नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
बऱ्याचदा आपण जेवण करताना कांदा, लसूण, मुळा यांचे सेवन करतो त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लिंबाचे पाणी प्यायले जाते. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
लिंबू पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात. लिंबाबरोबर कोमट पाणी घेतल्यास पोटातील सर्व विषारी गुणधर्म निघून जातात.
या बरोबर लिंबाच्या पाण्यामध्ये असलेल्या घटकामुळे शरीराला पोषकद्रव्ये शोषण्यास मदत मिळते. नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होतो.
आपल्याला लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: बी बी सी फूड