ओले खोबरे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपल्याकडे भाजीची चव वाढवण्यासाठी ओले खोबरे वापरले जाते. ओल्या खोबऱ्यापासून चटणी, बर्फी, मोदक, करंजी असे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. आपल्या घरात लहान-मोठे सर्वच जण हे पदार्थ आवडीने खातात परंतु याव्यतिरिक्त असेही अनेक पदार्थ आहेत ज्याबरोबर ओले खोबरे खाल्ले असता अपचन, वात, अशक्तपणा, कमी वजन, उष्णता अशा व्याधीं पळून जातात. चला तर मग जाणून घेऊयात ओले खोबरे खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

उन्हाळ्यातील प्रतिकूल वातावरणामुळे नाकातून रक्त येणे, अंगाची आग होणे असे सर्रास दिसून येते. नाकातून रक्त येत असेल तर ओले खोबरे तुमच्यासाठी चांगले नैसर्गिक औषध आहे. उन्हाळ्यात ओल्या खोबऱ्या बरोबर खडीसाखर व काळे मनुके खाल्याने अंगाची होत असलेली आग कमी होऊन नाकातून येणारे रक्त बंद होईल.

अनेकांना अपचनाचा त्रास वारंवार होतो अशावेळी रोजरोज औषधे घेणे शक्य नसते. अशा वेळी ओल्या खोबऱ्यापासून बनवलेली चटणी नक्कीच फायदेशीर ठरते. ओल्या खोबऱ्यात कडिपत्ता, आले, पुदिना व लसूण घालून चटणी करा ही चटणी रोज रात्री जेवताना खावा. याने तोंडाला चव देखील येते व अपचनाला औषधही होते.

बऱ्याचदा आजारातून बाहेर पडल्यावर अशक्तपणा जाणवतो, वजन ही कमी झालेले दिसते. अशक्तपणा, कमी वजन यावर ओले खोबरे फायदेशीर आहे. अशक्तपणा असेल तर खडीसाखर आणि वजन वाढवायचे असेल तर ओल्या खोबऱ्यासह काळा गूळ खावा. याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढेल.

अनेकदा खोकल्यामुळे घसा कोरडा पडतो. घशात खरखर होते अशा वेळी ओले खोबरे फायदेशीर ठरते. ओल्या खोबऱ्याचा किस व साखर एकत्र करून खाल्ल्याने तोंडाला चव येतेच पण यामुळे घशात ओलावा देखील रहातो.

वात प्रकृतीच्या लोकांना वाढत्या वयामुळे वाताच खूप त्रास होतो. यांनी आवर्जून ओले खोबरे व लसणाचा वापर करावा. मिरची न घेता ओले खोबरे व लसणाचा वापर करून चटणी बनवावी. याने वाताच्या त्रासापासून सुटका होते

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published.