सीताफळामध्ये कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वांचा मुबलक साठा असल्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने यास विशेष महत्त्व आहे. सीताफळ हे मूळचे भारतीय नसले तरीही भारतात सीताफळ खूप प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रामध्ये बीड, जळगांव, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्हयात सीताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. दौलताबाद व पुण्याची सीताफळे फारच स्वादिष्ट लागतात. चला तर जाणून घेऊयात सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.
सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृदयासाठी फायदेशीर असे फळ आहे. पित्ताचा त्रास होत असल्यास सीताफळ खाल्ल्याने आराम मिळतो.
सीताफळात कॅल्शिअम, लोह, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी1’ व ‘बी2’ जीवनसत्त्व असते. तसेच सीताफळात नैसर्गिक फलशर्कराही मोठ्या प्रमाणात असते. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खाल्याने फरक पडतो.
आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने आपल्याला ताजेतवाने वाटेल. केस गळण्याचे प्रमाण अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून लावा. नवीन केस उगवतील.
वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.
आम्लपित्त, अरुची, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे. सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खावे.
आपल्याला सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.