जर तुम्ही आतापर्यंत तमालपत्रे मसाला म्हणून वापरत असाल तर तुम्हाला तमाल पानांचे हे 5 अनोखे उपयोग माहित असलेच पाहिजेत. तमालपत्रांचा वापर आपले सौंदर्य खुलवतो.
तमालपत्र हे मसाल्यात वापरण्याचे कारण त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो तमालपत्रामध्ये असणाऱ्या एन्टी-इंफ्लैमेटरी, एंटीफंगल, एंटीबैक्टिरियल गुणांमुळे आयुर्वेदीक उपचारांसाठी विशिष्ट स्थान प्राप्त आहे.
तमालपत्राचे असे अनेक फायदे आहेत ते तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. चला तर मग पाहूया तमालपत्राचे नेमके कोणते फायदे आहेत.
चेहऱ्यावर डाग किंवा मुरुम असल्यास ही पान खूप फायदेशीर आहेत. कोमट पाण्यात तमालपत्र टाकून ते पाणी चेहऱ्यावर लावा किंवा तमालपत्रांची पेस्ट लावल्याने ही चेहरा स्वच्छ व निरोगी राहतो.
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तमालपत्र फायदेशीर आहे. तमालपत्राची बारीक पूड करून ती दातांना लावल्यास दातांवरील पिवळेपणा नाहीसा होईल. तुमचे दात पिवळे पडले असतील तर तमालपत्राची पूड लावा. दात चमकदार आणि पांढरे शुभ्र होतील.
तमालपत्राचे सेवन केल्याने चांगली झोप येते. तमालपत्राच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पिल्याने आपल्याला चांगली झोप येते. ज्यांना झोप लागत नाही त्यांनी हा उपाय करावा.
तुम्हाला वारंवार अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील प्रत्येक समस्येवर तमालपत्र हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही चहामध्ये तमालपत्र टाकून तो चहा पिऊ शकता. यामुळे कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुमची सुटका होईल.
सर्दी, फ्लू आणि संसर्गाची लक्षणे असतील तर त्यावर तमालपत्र चांगले औषध आहे. श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवल्यास 2 ते 3 तमालपत्र पाण्यात 10 मिनिटे उकळवा.
या पाण्यात कपडा बुडवून आपल्या छातीवर लावल्यास सर्दी, खोकला कमी होतो. तमालपत्र चहा ताप कमी करण्यासाठी प्रभावी आहे. वारंवार शिंका येणे ही समस्या असेल तर तमालपत्र फार प्रभावी औषध आहे.
आपल्याला तमालपत्राचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.