तांदुळजाची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

तांदुळजाच्या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. तांदुळजा एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही भाजी खाल्ल्याने आपल्याला सी विटामिन  मिळते. तसेच अनेक आजरांपासून आपण दूर राहतो. आज आपण तांदुळजाची भाजी खाण्याचे फायदे पाहणार आहोत.

तांदुळजा भाजी खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. तांदुळजाची भाजी खाल्याने शरीरामध्ये वाढलेली उष्णता कमी होते. त्यामुळे जर उष्णता वाढत असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणून या भाजीचे सेवन केल्यास उष्णतेपासून तुमची सुटकारा होईल.

जर तुमच्या शरीरावर कांजण्या उठल्या असतील तर ही भाजी खाणे उपयुक्त आहे. तसेच ही भाजी खाल्याने गोवर उठली असेल तर कमी होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर आहे.

पित्ताचा त्रास असेल तर तांदुळजाची भाजी खावी. या भाजीच्या सेवनाने पित्त कमी होईल. तसेच मुळव्याधचा त्रास असेल तर त्यावर ही भाजी म्हणजे उत्तम औषध आहे.

स्त्रियांना ही भाजी खाण्यासाठी दिली जाते. लघवी साफ करण्याचे गुणधर्म या भाजीत आहेत त्यामुळे मूत्रदोष होत नाहीत. ही भाजी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे या भाजीचे सेवन करावे.

बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते. शरीराला आवश्यक सर्व घटक तांदुळजा भाजीत आहेत. त्यामुळे तांदुळजा भाजीचा आपल्या आहारात समावेश आवर्जून करा.

आपल्याला तांदुळजाची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट  लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.

अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. संदर्भ: दैनिक प्रभात आणि १ एम जी

About Editor INFO Marathi

Thank you for using our Website. Show some love and spread words about our website. Also, Before accessing our site, Please read our Disclaimer, Terms of Service, and Privacy policy.
View all posts by Editor INFO Marathi →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *