दिवसभराच्या कामाचा क्षीण घालवण्यासाठी थोडे मनोरंजन म्हणून प्रत्येकजण TV पहात असतो. विरंगुळा म्हणून TV पहाणे ठीक आहे पण आजकाल जेवण करतानाही TV पाहिला जातो. लहान मुले नकळत मोठ्यांचेच अनुसरण करतात.
आजकाल लहान मुले तर TV शिवाय जेवण करत नाहीत. लहान असो वा मोठे प्रत्येकाला जेवन करताना TV पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत जेवण करताना TV पाहण्याचे दुष्परिणाम.
TV समोर बसून जेवल्याने आपले लक्ष जेवणाकडे नसून TV कडे असते. त्यातील संगीत, भीतिदायक प्रसंग, थ्रिल यामुळे आपण किती जेवतोय याचेही भान नसते. अनेकदा नकळत ताटातले जेवण संपले तरीही कळत नाही. यामुळे प्रमाणापेक्षा जास्त अन्न पोटात जाते परिणामतः पोटाच्या तक्रारी वाढतात.
घरात मित्रमंडळी अथवा सहकुटुंबासोबत TV बघताना चिप्स, सारखे फास्ट फूड, जंक फूड आवर्जून खाल्ले जातात. लक्ष TV कडे असल्याने आपण त्याचे किती पॅकेट संपवतो याकडे लक्ष नसते. अधिक प्रमाणात असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी डोके वर काढतात.
TV बघत जेवल्याने मेटॅबॉलिक प्रक्रिया हळू होते यामुळे कमरेभोवती अनावश्यक चरबी निर्माण होते. यामुळे लहान असो वा मोठे सर्वाना लठ्ठपणा ची समस्या भेडसावते. खास करून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते म्हणून TV समोर बसून जेवण करणे टाळायला हवे.
रात्री झोप येत नाही अशी तक्रार अनेकजण करत असतात. याचे एक कारण TV देखील आहे. जेवण करताना TV बघितल्याने पचनक्रिया बिघडते याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो.
TV बघत जेवण केल्याने आपल्या मेंदूचे लक्ष पूर्णपणे TV कडे असते त्यामुळे खात असलेल्या अन्नाची चव आपल्याला लागत नाही. जेवण केल्याचे समाधान देखील मिळत नाही. म्हणून आजपासूनच ही सवय मोडा.
आपल्याला TV समोर बसून जेवण केल्याचे दुष्परिणाम हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीची अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.