भारतीयाच्या आहारात वरण भात हा असतोच. आपल्या इथे वरण भात खाल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे बोलत नाही. वरण भात हा पचायला हलका असल्याने लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच आवर्जून वरण भात दिला जातो.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वरण भात खाण्याचे आरोग्यादायी फायदे. वरण भात हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. आपण आहारात वरण भाताचा समावेश केल्याने आपल्या मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात.
वरण भात पचायला अगदी सोपे असते. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास वरण भात खा. त्यात भरपूर फायबर असतात. जे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.
भातामध्ये कॅल्शिअम व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन असते. जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. वरण भाताचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत मिळते. आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती मिळते.
भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. तसेच मुग डाळीच्या वरणामध्ये असलेले फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. ज्यामुळे पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. वरण भाताचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपल्याला दिवसभर अक्टिव्ह राहण्यासाठी एनर्जी मिळते.
वरण भाताचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपल्याला जीवनसत्त्वे, कार्ब, प्रथिने आणि खनिज असे पोषक घटक मिळतात. म्हणूनच आपण हि आपल्या आहारात वरण भाताचा समावेश अवश्य करा.
आपल्याला वरण भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहितीपर लेख पोहचवण्यासाठी पोस्ट शेयर करा. जेणेकरून आपल्या मित्र मैत्रिणीना हि या माहितीचा फायदा होईल.
अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आपल्या काही सूचना अथवा इतर कोणत्या विषयांवर आपल्याला माहिती हवी आहे हे कमेंट द्वारे कळवा. इतर विषयांवर लिहलेले लेख देखील वाचा. या माहिती विषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून या माहितीच्या अचूकतेबद्दल इन्फोमराठी कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.